कोलकाता, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. तृणमूल काँग्रेसच्या घोषणापत्रातही हा मुद्दा मांडण्यात आला आहे. राजकीय विरोधक दंगली घडवून मते मिळवत आहे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. केंद्र सरकारने अद्याप समान नागरी कायदा केलेला नाही. पण या विषयावर आधीच घोषणा करून राज्यातील मुसलमान मतदारांना आकर्षित करण्याची धडपड ममतांनी केल्याची चर्चा आहे. ममतांनी दंगलीच्या मुद्यावर जाहीर वक्तव्य करत त्यांची विशिष्ट मतदारवर्गाला आकर्षित करण्याची धडपड सुरू असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिल्याची चर्चा आहे.