नवी दिल्ली, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी छोट्या राजकीय पक्षांना आणि अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन पक्षाला अर्थात ‘वंचित’ला निवडणूक आयोगाने प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह दिले आहे. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला अर्थात ‘रासप’ला निवडणूक आयोगाने शिट्टी हे निवडणूक चिन्ह दिले आहे. रिपब्लिकन सेनेला निवडणूक आयोगाने गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह दिले आहे.