जालना, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून चर्चेत आलेल्या मनोज जरांगे यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले. ही घोषणा करून मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले. याआधी महायुती सरकारने राज्यात मराठ्यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही आठवड्यांतच लोकसभेच्या रिंगणातून माघर घेत असल्याचे जरांगेंनी जाहीर केले. जरांगेंनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यामुळे वंचित आणि जरांगे यांची युती होण्याची शक्यता मावळली आहे.