परीक्षेच्या उत्तरपत्रिकेतून आता पुरवणी हद्दपार

प्रतिनिधी, पुणे, दि. १३ मार्च २०२४ : परीक्षेची उत्तरपत्रिका म्हंटली की त्यामध्ये पुरवणीचा खारीचा वाटा आलाच. पुरवणी घेतली म्हणजे खूप अभ्यास झालाय किंवा पुरवणी घेऊन भरभरून लिहिलं म्हणजे थोडे जास्त गुण मिळतील. असं वाटणाऱ्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. विद्यापीठांच्या सत्र परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यासाठी उत्तरपत्रिका देण्यात येतात. मात्र, विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यासाठी उत्तरपत्रिकांची पाने कमी […]

परीक्षेच्या उत्तरपत्रिकेतून आता पुरवणी हद्दपार

प्रतिनिधी, पुणे, दि. १३ मार्च २०२४ : परीक्षेची उत्तरपत्रिका म्हंटली की त्यामध्ये पुरवणीचा खारीचा वाटा आलाच. पुरवणी घेतली म्हणजे खूप अभ्यास झालाय किंवा पुरवणी घेऊन भरभरून लिहिलं म्हणजे थोडे जास्त गुण मिळतील. असं वाटणाऱ्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. विद्यापीठांच्या सत्र परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यासाठी उत्तरपत्रिका देण्यात येतात. मात्र, विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यासाठी उत्तरपत्रिकांची पाने कमी पडतात. अशा वेळी विद्यार्थांना पुरवणी उत्तरपत्रिका देण्यात येते. मात्र, या उत्तरपत्रिकेची काहीच पाने वापरली जातात आणि उर्वरित वाया जातात. तसेच, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आगामी सत्र परीक्षांपासून विद्यार्थ्यांना पुरवणी उत्तरपत्रिका देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

परीक्षा केंद्रातून पुरवणी गहाळ होणे, पुरवणी न सापडणे, पुरवणी न जोडताही ती दिल्याची तक्रार करणे, त्यानंतर चौकशी आदी अडचणी उभ्या ठाकतात. या सर्वांवर उपाय म्हणून विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने पुरवणी देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी मुख्य उत्तरपत्रिकेतच पाने वाढवून देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यास अडचण येणार नाही.

या निर्णयामुळे विद्यापीठाची आर्थिक बचतही होणार आहे. पुरवणी छापण्यासाठी विद्यापीठाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. त्याचप्रमाणे पुरवणी सांभाळणे, त्यांची सुरक्षित वाहतूक करणे, महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यासाठी विद्यापीठाला खर्च येतो. पुरवणी उत्तरपत्रिकांवर ठरावीक क्रमांक नसणे, त्या माध्यमातून गैरप्रकार होण्याची शक्यता टाळता येत नाही. आगामी एप्रिल-मे महिन्यापासून होणाऱ्या सत्र परीक्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number