उज्ज्वला योजनेतील एलपीजी सवलतीला मुदतवाढ

नवी दिल्ली, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने पीएम उज्ज्वला योजनेतील एलपीजी सवलतीला मुदतवाढ दिली आहे. ही योजना आता ३१ मार्च २०२५ पर्यंत कार्यरत राहणार आहे. या योजनेत प्रत्येक एलपीजी सिलेंडरवर ३०० रुपयांची सवलत मिळते. ही सवलत आता ३१ मार्च २०२५ पर्यंत मिळेल. पीएम उज्ज्वला योजनेत दरवर्षी १२ एलपीजी सिलेंडरवर सवलत दिली […]

उज्ज्वला योजनेतील एलपीजी सवलतीला मुदतवाढ

नवी दिल्ली, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने पीएम उज्ज्वला योजनेतील एलपीजी सवलतीला मुदतवाढ दिली आहे. ही योजना आता ३१ मार्च २०२५ पर्यंत कार्यरत राहणार आहे. या योजनेत प्रत्येक एलपीजी सिलेंडरवर ३०० रुपयांची सवलत मिळते. ही सवलत आता ३१ मार्च २०२५ पर्यंत मिळेल.

पीएम उज्ज्वला योजनेत दरवर्षी १२ एलपीजी सिलेंडरवर सवलत दिली जाते. योजनेंतर्गत १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरवर सवलत देण्यात येते. प्रत्येक नव्या १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडर जोडणीसाठी केंद्र सरकारकडून पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र ग्राहकाला १६०० रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. तसेच प्रत्येक नव्या पाच किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडर जोडणीसाठी केंद्र सरकारकडून पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र ग्राहकाला ११५० रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. ही व्यवस्था पण ३१ मार्च २०२५ पर्यंत कार्यरत राहणार आहे.

केंद्र सरकारने केंद्राच्या सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि महागाई दिलासा भत्त्यात १ जानेवारी २०२४ पासून चार टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे डीए आणि डीआरमध्ये १ जानेवारी २०२४ पासून चार टक्क्यांची वाढ होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number