प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढणार ?

मुंबई, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले आहेत. एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये झालेल्या चर्चेतून बाहेर आल्यानंतर प्रकाश आंबेडकर स्वतःच्या वाहनात बसून वेगाने निघून गेले. जाण्याआधी प्रसारमाध्यमांनी त्यांना चर्चेत काय झाले याविषयी प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना ‘माझा […]

प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढणार ?

मुंबई, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले आहेत.

एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये झालेल्या चर्चेतून बाहेर आल्यानंतर प्रकाश आंबेडकर स्वतःच्या वाहनात बसून वेगाने निघून गेले. जाण्याआधी प्रसारमाध्यमांनी त्यांना चर्चेत काय झाले याविषयी प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना ‘माझा चेहराच सगळं सांगतोय’ असे सूचक वक्तव्य करून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर निघून गेले.

याआधी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू असताना वंचित बहुजन आघाडीने मविआकडे २६ ते २७ जागांची मागणी केली होती. किमान तीन ते पाच मुसलमानांना उमेदवारी द्यावी अशीही मागणी वंचितने मविआकडे केली होती. या मागण्या मान्य झाल्या नसल्याचे सूत्रांकडून समजते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number