नवी दिल्ली, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपाने आचारसंहिता जाहीर होण्याआधी लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांच्या नावांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील एकाही लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झालेली नाही. राज्यातील उमेदवारांबाबात चर्चा सुरू आहे. अद्याप निर्णय व्हायचा आहे. यामुळे राज्यातील एकाही उमेदवाराचे नाव पहिल्या यादीत नाही. चर्चा झाल्यानंतर पुढील काही दिवसांत भाजपाकडून राज्यातील उमेदवारांची नावं जाहीर केली जातील, असे भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘जय महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.