प्रतिनिधी, मुंबईत, दि. २५ फेब्रुवारी २०२४ : गेले अनेक दिवस मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे उपोषण करत आहते. पण आताच्या घडीला मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच परतला असून याचबाबत मनोज जरांगे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तसेच मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर टीका केली. या टीकेनंतर मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
मराठा कार्यकर्त्यांकडून जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची जरांगेंची भूमिका असून ते उपोषण स्थळ सोडून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सध्या आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. उपोषण करुन मरण्यापेक्षा फडणवीसांच्या दारात जातो, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत.