बारामतीत नणंद, भावजय आमने – सामने

बारामती, २३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : बारामतीत राशपच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा अजित पवार निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. शरद पवारांची मुलगी अशीही सुप्रिया सुळेंची ओळख आहे तर सुप्रिया सुळेंचे चुलत भाऊ अजित पवार यांची पत्नी अशी सुनेत्रा पवारांची ओळख आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा अजित पवार निवडणूक रिंगणात उतरण्याची […]

बारामतीत नणंद, भावजय आमने – सामने

बारामती, २३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : बारामतीत राशपच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा अजित पवार निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. शरद पवारांची मुलगी अशीही सुप्रिया सुळेंची ओळख आहे तर सुप्रिया सुळेंचे चुलत भाऊ अजित पवार यांची पत्नी अशी सुनेत्रा पवारांची ओळख आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा अजित पवार निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्यामुळे बारामतीत नणंद, भावजय आमने – सामने आल्याचे चित्र आहे.

निवडणुकीसाठीच्या तयारीचा भाग म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा अजित पवार या दोघींनी केलेल्या कामाची माहिती देणारे व्हिडीओ रथ बारामतीत फिरू लागले आहेत. एकाच दिवशी दोघीजणी बारामतीत वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागल्या आहेत. मतदारसंघातील गावागावांना भेटी देऊन जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्यावेळी बारामतीत काय होणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number