सर्वोच्च न्यायालयाने फिरवला निवडणूक निकाल

चंदिगड, २० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : चंदिगडच्या महापौर निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्याने जाहीर केले होते. हा निर्णय रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने ‘आप’च्या उमेदवाराचा विजय झाल्याचे जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ‘आप’चे उमेदवार कुलदीप कुमार हे चंदिगडचे महापौर झाले. पीठासीन अधिकाऱ्याने पक्षपात केला तसेच खोटी साक्ष देत न्यायालयाची दिशाभूल केली, असे सांगत सर्वोच्च […]

सर्वोच्च न्यायालयाने फिरवला निवडणूक निकाल

चंदिगड, २० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : चंदिगडच्या महापौर निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्याने जाहीर केले होते. हा निर्णय रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने ‘आप’च्या उमेदवाराचा विजय झाल्याचे जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ‘आप’चे उमेदवार कुलदीप कुमार हे चंदिगडचे महापौर झाले. पीठासीन अधिकाऱ्याने पक्षपात केला तसेच खोटी साक्ष देत न्यायालयाची दिशाभूल केली, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने चंदिगड निवडणूक प्रकरणी पीठासीन अधिकाऱ्याला दोषी ठरवले.

पीठासीन अधिकाऱ्याने पक्षपात केला. या पक्षपाती वागणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ आणि इतर साक्षीपुरावे यांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. पीठासीन अधिकाऱ्याने ज्या आठ उमेदवारांची मते बाद ठरवली होती ती मते वैध धरावी आणि नव्याने मतमोजणी करून निकाल जाहीर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. यानंतर झालेल्या मतमोजणीची माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली. या माहितीआधारे ‘आप’च्या उमेदवाराचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number