उद्धवना बावनकुळेंचे प्रत्युत्तर

मुंबई, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ही टीका करताना त्यांनी ज्या भाषेचा वापर केला त्यावरून भाजपाने नाराजी व्यक्त केली. भाजपाचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव यांना ट्वीट करून प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव यांनी मर्यादा […]

उद्धवना बावनकुळेंचे प्रत्युत्तर

मुंबई, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ही टीका करताना त्यांनी ज्या भाषेचा वापर केला त्यावरून भाजपाने नाराजी व्यक्त केली. भाजपाचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव यांना ट्वीट करून प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव यांनी मर्यादा ओलांडल्या. यामुळे त्यांच्याविषयी कीव वाटू लागल्याचे बावनकुळे म्हणाले. राजकीय विरोधकावर टीका करताना सभ्यता, संस्कृती पाळावी लागते. पण आपण ज्या पद्धतीने बोलत आहात ते बघून आपल्या प्रकृतीची अधिकच काळजी वाटू लागते. जाहीर सभेतील आपली भाषणे, पत्रकार परिषदेतील आपली विधाने ऐकल्यानंतर आपण सध्या प्रचंड मानसिक तणावात आहात, हे लक्षात येते. आपली ही अवस्था आपण स्वतःचा हाताने करवून घेतली. ‘असंगाशी संग‘ केल्यानंतर असेच होणार; असे बावनकुळे यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number