मुंबई, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबईत फेसबुक लाईव्ह करून शिउबाठाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हाने यानंतर आत्महत्या केली. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी अमरेंद्र मिश्राला मंगळवार १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अमरेंद्रने त्याला अडकवले जात असल्याचा दावा केला. अभिषेक घोसाळकर यांची हत्या आणि मॉरिसची आत्महत्या या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे.
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण
मिश्राला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
मला फसवलं जातंय – मिश्रा
अमरेंद्र मिश्रा मॉरिसचा अंगरक्षक