बीड, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : आता फसगत होऊ द्या नाहीतर काहीही होऊ द्या… मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी खंबीर आहे… जर मराठा आरक्षणाला धोका झाला, तर मी मंडल आयोगाला आव्हान देईन; असे मनोज जरांगे म्हणाले. ते बीडच्या नारायणगड येथे दर्शनासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जरांगेंच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांच्या आरक्षणाच्या निमित्ताने थेट मंडल आयोगाला आव्हान दिले गेले तर आरक्षणाच्या धोरणावर न्यायालयात नव्याने विचार होण्याची शक्यता आहे.