अयोध्येत पाच लाख भाविकांनी घेतलं दर्शन

अयोध्या, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येत पहिल्याच दिवशी पाच लाख भाविकांनी रामाचे दर्शन घेतले. प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी तसेच दर्शन घेऊन परत जाण्यासाठी आलेल्यांची रेल्वे स्थानकावर आणि राज्य परिवहनच्या बस डेपोत प्रचंड गर्दी झाली. कडाक्याच्या थंडीतही रामभक्तांचा उत्साह कायम आहे. परिस्थितीचा अंदाज येताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला निर्देश दिले. गर्दीचे नियोजन […]

अयोध्येत पाच लाख भाविकांनी घेतलं दर्शन

अयोध्या, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येत पहिल्याच दिवशी पाच लाख भाविकांनी रामाचे दर्शन घेतले. प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी तसेच दर्शन घेऊन परत जाण्यासाठी आलेल्यांची रेल्वे स्थानकावर आणि राज्य परिवहनच्या बस डेपोत प्रचंड गर्दी झाली. कडाक्याच्या थंडीतही रामभक्तांचा उत्साह कायम आहे. परिस्थितीचा अंदाज येताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला निर्देश दिले. गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे स्थानक आणि राम मंदिर परिसर तसेच अयोध्येतील सर्व प्रमुख रस्ते या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने घडामोडींवर लक्ष ठेवून परिस्थितीनुसार गर्दीचे नियोजन सुरू आहे. रामाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असताना तसेच दर्शन घेतल्यावर लगेच सेल्फी काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number