कोरोनाबाधितांची संख्या वाढली

छत्रपती संभाजीनगर, ०८ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवार, ७ अखेर कोरोना रुग्णांचा आकडा ३० पर्यंत पोहोचला आहे. यात सर्वाधिक पॉझिटिव्ह १४ रुग्ण पैठण तालुक्यात आढळले आहेत. त्यापाठोपाठ १० पॉझिटिव्ह रुग्ण गंगापूर तालुक्यात, ४ कन्नड तालुक्यात तर फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्यात प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झाली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आरटीपीसीआर […]

कोरोनाबाधितांची संख्या वाढली

छत्रपती संभाजीनगर, ०८ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवार, ७ अखेर कोरोना रुग्णांचा आकडा ३० पर्यंत पोहोचला आहे. यात सर्वाधिक पॉझिटिव्ह १४ रुग्ण पैठण तालुक्यात आढळले आहेत. त्यापाठोपाठ १० पॉझिटिव्ह रुग्ण गंगापूर तालुक्यात, ४ कन्नड तालुक्यात तर फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्यात प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झाली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्टसह आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. या ३० पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १५ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे तर उर्वरित १५ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number