गोगावलेंच्या मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’

लोणेरे, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या मतदारसंघात शुक्रवार ५ जानेवारी २०२४ रोजी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे हा कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यातील इतर प्रमुख मंत्री नागरिकांशी संवाद साधणार […]

गोगावलेंच्या मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’

लोणेरे, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या मतदारसंघात शुक्रवार ५ जानेवारी २०२४ रोजी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे हा कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यातील इतर प्रमुख मंत्री नागरिकांशी संवाद साधणार आहेत. सरकारी योजनांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. राज्य शासन करत असलेल्या कामांची माहिती थोडक्यात सांगितली जाणार आहे.

वाहतूक नियमन

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनं ही महाड जवळ थांबवण्यात येत आहेत. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम संपल्यानंतर काही तासांनी अवजड वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू केली जाणार आहे.

उद्धव गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावेळी आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी लोणेरे येथे तसेच आसपासच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number