नवी दिल्ली, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज भारतीयांसाठी प्रेरणास्थान. शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग हा किल्ला ऐतिहासिक आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
नौदल दिनाची दहा वैशिष्ट्ये
१. दरवर्षी ४ डिसेंबरला भारतीय नौदलाचा नौदल दिन
२. मालवणात नौदल दिनाचा सोहळा
३. नौदल दिनाच्या निमित्ताने मोदी मालवणात
४. मोदी मालवणात येणारे पहिले पंतप्रधान
५. भारताने ४ डिसेंबर १९७१ रोजी कराची बंदरावर हल्ला केला
६. याची आठवण म्हणून साजरा करतात नौदल दिन
७. भारतातले पहिले आरमार अर्थात नौदल शिवरायांनी स्थापले
८. आरमाराच्या जोरावर शिवाजी महाराजांनी जलदुर्ग बांधले आणि राखले
९. सिंधुदुर्ग हे त्याचे आदर्श उदाहरण आहे
१०. शिवरायांच्या कतृत्वाची आठवण म्हणून यंदाचा नौदल दिन मालवणच्या किनाऱ्यावर, सिंधुदुर्गावर
नौदलाचा गौरव अमिताभच्या आवाजात
भारतीय नौदलाने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली एक ध्वनीचित्रफीत प्रकाशीत केली आहे. यात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात नौदल दिनाची महती सांगितली आहे.