डाळी, भाज्यांचे भाव कडाडले

ठाणे, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : तूरडाळीसह इतर डाळींचे भाव हळूहळू गगनाला भिडत आहेत. साधे वरणभात खाणे देखील कठीण होऊ लागले आहे. अवकाळी पाऊस झाल्याने तूरडाळीचे उत्पादन २५ टक्के घटले आहे. येणाऱ्या काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच आता कांदा आणि टोमॅटोचे भाव शंभरीकडे वाटचाल करत आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. […]

डाळी, भाज्यांचे भाव कडाडले

ठाणे, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : तूरडाळीसह इतर डाळींचे भाव हळूहळू गगनाला भिडत आहेत. साधे वरणभात खाणे देखील कठीण होऊ लागले आहे. अवकाळी पाऊस झाल्याने तूरडाळीचे उत्पादन २५ टक्के घटले आहे. येणाऱ्या काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच आता कांदा आणि टोमॅटोचे भाव शंभरीकडे वाटचाल करत आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

डाळी, भाज्यांचे भाव कडाडले

दीड ते दोन महिन्यांपूर्वी तेजीत असलेल्या कोथिंबीर, मेथीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पोषक वातावरणामुळे लागवड वाढली असून, घाऊक बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कोथिंबीर, मेथी विक्रीस पाठवली असल्याने कोथिंबीर, मेथीला कवडीमाेल भाव मिळत आहे. पिंपरी चिंचवड येथील मोशी बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची विक्री प्रतवारीनुसार दोन ते पाच रुपये दराने करण्यात येत आहे. मेथीच्या एका जुडीला पाच ते सात रुपये दर मिळत आहे मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर, मेथीची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला पाच ते दहा रुपये दर तर मेथीच्या एका जुडीची विक्री दहा ते वीस रुपये दराने करण्यात येत आहे.

अवकाळी पावसामुळे दोन कोटींची साखर भिजली

रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील पाचशे मेट्रिक टन साखर भिजली आहे. कारखान्याचे तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गोदामात सगळीकडे साखरेचा पाक दिसत आहे. यामुळे गाळपाचा वेग मंदावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number