मुंबई, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपाच्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पुणे विद्यापीठातील ताज्या घडामोडींचा संदर्भ या ट्वीटला आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. याच संदर्भात चित्रा वाघ यांनी ट्वीट केले आहे.

ह्याच विद्येच्या माहेरघरात देशाचे आदरणीय पंतप्रधान @narendramodi जीं विषयी निंदनीय मजकूर खरडणारी उलटी ‘मती’ कुणाची असेल हो मोठ्ठ्या ताई ?
आतापर्यंत शांत असलेलं विद्येचं माहेरघर कुणाच्या इशाऱ्यांनी अस्वस्थ होतंय, हे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे.