हिंगोली, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाची तीव्रता लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यातही आंदोलने चालू होते. यादरम्यान परिवहन महामंडळाच्या बसवर काही ठिकाणी दगडफेक जाळपोळ, सरकारी फलकावरील फोटोला काळे फासने अशा हिंसक आंदोलनामुळे जिल्ह्यातील तीनही आगाराच्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये हिंगोली कळमनुरी वसमत या आगाराचे ५६ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हिंगोली आगारात ६३ बस ३७० बसफेऱ्या, कळमनुरी ३४ बस १८४ बसफेऱ्या, वसमत ५६ बस १८४ बसफेऱ्या होत. तीन दिवसात ५६ लाखांचे नुकसान झाले आहे. अशात काही दिवसांवर दिवाळी सण असताना आत पुन्हा बस फेऱ्या कधी सुरू होणार हे पाहणं तितकच गरजेचं आहे.