दंगलखोरांवर हत्येचा गुन्हा

मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या अहिंसक आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हिंसक घटनांची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. दंगलखोरांवर हत्येचा गुन्हा दाखल होणार आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने दंगलखोरांची ओळख पटवून त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. घरात लोकं असताना ते घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा […]

दंगलखोरांवर हत्येचा गुन्हा

मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या अहिंसक आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हिंसक घटनांची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. दंगलखोरांवर हत्येचा गुन्हा दाखल होणार आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने दंगलखोरांची ओळख पटवून त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. घरात लोकं असताना ते घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसा थांबवा असे आवाहन केले आहे. हिंसा करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. अहिंसक आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

हिंसाचारामागे राजकीय नेते

हिंसाचारामागे काही राजकीय नेते आणि काही पक्षांचे कार्यकर्ते सहभागी आहेत. सीसीटीव्ही फूटेजच्या राजकीय पक्षांशी संबंधित दंगलखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे; अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. समाजमाध्यमांवरील धमक्यांची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणांमध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. ज्या नेत्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका असल्याचे अहवाल आले आहेत, त्यांना संरक्षण देण्यात आले आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जालन्यात इंटरनेट बंद

जालन्यात कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number