पुणे, २७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पुणे ड्रग्ज प्रकरणी महिला पोलिसाचे निलंबन झाले आहे. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता हनुमंत भागवत यांचे निलंबन झाले आहे. ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
ललित पाटीलवर ससूनच्या अधिष्ठात्याचा वरदहस्त
ड्रग तस्कर ललित पाटीलवर ससूनच्या अधिष्ठात्याचा वरदहस्त होता. याच कारणामुळे ललित तुरुंगात असताना आजारपणाचे कारण देऊन ससूनमध्ये उपचाराच्या नावाखाली राहू शकला. ससूनमधून तो बिनबोभाट ड्रग्जची तस्करी करत होता. तसेच अधूनमधून ससूनमधून बाहेर पडून एका खासगी हॉटेलमध्ये जाऊन लोकांना भेटत होता. कक्ष क्रं १६ ची नोंदवही समोर आल्याने हे प्रकार उघड झाले आहेत. यामुळे ससूनच्या अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
अंबादास दानवे ससून रुग्णालयात
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ससून रुग्णालयात जाऊन ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाची माहिती घेणार आहेत. ससूनचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्याकडून घेणार माहिती घेणार आहेत.
माजी महापौर विनायक पांडेंना चौकशीची नोटीस
ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी माजी महापौर विनायक पांडेंना नाशिक पोलिसांनी नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले आहे.