अमरावती, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात भिंतीवरून चेंडू फेकले जातात. चेंडूत भरून गांजा, गुटखा यांची पाकिटे कारागृहात पाठवली जात आहेत. कारागृह कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. दुपारच्या सुमारास कारागृहातील टीनपत्रावर काहीतरी वस्तू आदळल्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता, एक लाल रंगाचा चेंडू आढळून आला. त्यामध्ये त्यांनी गार्डला चेंडूवर लक्ष ठेवायला सांगून तातडीने या प्रकाराची माहिती कारागृह अधीक्षक यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार फ्रेजारपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.