शिवसैनिकांच्या गाडीला रत्नागिरी – नागपूर महामार्गावर अपघात

शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी अनेक नेते, पदाधिकारी, शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. याच मेळाव्यासाठी मुंबईला जात असताना शिवसैनिकांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. कवटेमहाकांळ तालूक्यातून जात असताना रत्नागिरी नागपूर महामार्गावरील शिरढोण गावाजवळ हा अपघात झाला आहे. एका ट्रकने पदाधिकाऱ्यांच्या गाडीला मागून धडक […]

शिवसैनिकांच्या गाडीला रत्नागिरी – नागपूर महामार्गावर अपघात

शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी अनेक नेते, पदाधिकारी, शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. याच मेळाव्यासाठी मुंबईला जात असताना शिवसैनिकांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत.

कवटेमहाकांळ तालूक्यातून जात असताना रत्नागिरी नागपूर महामार्गावरील शिरढोण गावाजवळ हा अपघात झाला आहे. एका ट्रकने पदाधिकाऱ्यांच्या गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. शिंदे गटाच्या युवासेनेचे पदाधिकारी होते अशी माहिती समोर आली आहे. विवेक सुरेश तेली विद्यानगर कवठेमहांकाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून महेश शिवाजी सूर्यवंशी कवठे महांकाळ, संदीप शिंत्रे, सुभाष कूनुरे दोघे रा. हिंगणगाव ता.कवठे महांकाळ, प्रसाद सूर्यवंशी रा. कवठे महांकाळअशी जखमीची नावे आहेत आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चार चाकी वाहन (क्रमांक एम. एच.१० ए.जी.४३२०) चार चाकी वाहनातून कवठे महांकाळ येथून मुंबई येथे होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना दसरा मेळाव्यासाठी निघाले होते.

दरम्यान, रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव हद्दीमधील करपे हायस्कूलच्या समोर आले असता पाठीमागून गोपाळपूर येथून मिरज तालुक्यातील काननवाडी कडे निघालेला दुधाचा टँकर (क्रमांक एम.एच.१० झेड ४४८१) याची चार चाकी वाहनाला पाठीमागून जोराची धडक बसली यामध्ये चार चाकीवाहनाच्या मध्यभागी बसलेला विवेक सुरेश तेली ( वय४०) रा. विद्यानगर कवठेमहांकाळ याचा मिरज येथील शासकीय रुग्णालयातउपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर इतर ३ जण जखमी झालेत. जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस घटनेचा आधिक तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number