नाशिक, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे गावातून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांच्या साठ्याप्रकरणी पुढील तपास पोलिसांची गुन्हे अन्वेषण शाखा अर्थात क्राईम ब्रँच करणार आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाई नंतर नाशिक पोलिसांनी गावात धाड टाकली होती. आता गावात आढळलेल्या अंमली पदार्थांच्या साठ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखा पुढील तपास करणार आहे. पोलिसांनी गावातून कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. अंमली पदार्थ प्रकरणी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांची चौकशी करण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक पुण्याला रवाना झाले आहे.
पाच दिवसांची पोलीस कोठडी
अंमली पदार्थ प्रकरणी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
‘ललित पाटील पळाला की… ?’
अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पुण्याच्या तुरुंगात असलेला ललित पाटील वारंवार आजारपणाचे कारण देत ससून रुग्णालयात दाखल होत होता. रुग्णालयातून तो अंमली पदार्थांचा व्यापार हाताळत होता, हे वास्तव आता उघड झाले आहे. ललित ससूनमधून एका खासगी हॉटेलमध्ये गेला होता. याच हॉटेलमध्ये तासाभराने एक पोलीस पोहोचला. ससूनमध्ये जिथे उपचार घेण्यासाठीचे कारण देत ललित दाखल झाला होता तिथे बंदोबस्तासाठी असलेला पोलीसच हॉटेलमध्ये आल्याचे सीसीटीव्ही फूटेज आढळले आहे. हे फूटेज ‘जय महाराष्ट्र’च्या हाती आले आहे. यामुळे ललित पाटीलला फरार होण्यासाठी मदत करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
‘ललित पाटीलशी आमचे कुठलेही संबंध नाही’
ललित पाटीलच्या आईचं स्पष्टीकरण
…………….
अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील फरार
पुणे पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि सहकारी अभिषेक बलकवडेला अटक
नेपाळ सीमेवरील बाराबंकी येथून दोन्ही आरोपींना अटक
……..
ससूनच्या अधिष्ठातांसह ६ डॉक्टरांविरोधात आमदार धनगेकरांची तक्रार
पोलीस आयुक्तांना रवींद्र धनगेकरांचं पत्र