सणाच्या मुहुर्तावर गृहनिर्माण प्रकल्प ? काय दिलाय महारेराने इशारा ?

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या मुहुर्तावर गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा, सुरुवात करता यावी यासाठी महारेराकडे आपले अर्ज सर्व विहित कागदपत्रांसह आणि वेळेत सादर करा. असे आवाहन महारेराने विकासकांच्या स्वंयंविनियामक संस्थांना विशेष पत्र लिहून केले आहे. सर्व विकासक आणि प्रवर्तकांसाठी हे पत्र महारेराच्या संकेतस्थळावरही टाकण्यात आले आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी या […]

सणाच्या मुहुर्तावर गृहनिर्माण प्रकल्प ? काय दिलाय महारेराने इशारा ?

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या मुहुर्तावर गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा, सुरुवात करता यावी यासाठी महारेराकडे आपले अर्ज सर्व विहित कागदपत्रांसह आणि वेळेत सादर करा. असे आवाहन महारेराने विकासकांच्या स्वंयंविनियामक संस्थांना विशेष पत्र लिहून केले आहे. सर्व विकासक आणि प्रवर्तकांसाठी हे पत्र महारेराच्या संकेतस्थळावरही टाकण्यात आले आहे.

नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या मुहुर्तावर अनेक विकासक/प्रवर्तक आपल्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा करीत असतात. यासाठी त्यांना महारेरा नोंदणीक्रमांक असल्याशिवाय प्रकल्पाची जाहिरात, नोंदणी, विक्री करता येत नाही. नोंदणीक्रमांक देण्याची महारेराची कार्यपद्धती ठरली आहे. यात महारेरा ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक प्रस्तावाची आर्थिक, कायदेविषयक आणि तांत्रिक छाननी काटेकोरपणे करते. या विकासकांना लवकरात लवकर नोंदणीक्रमांक मिळावेत यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे. पण अपेक्षित कागदपत्रे सादर न केल्यास, त्रुटींची पूर्तता न झाल्यास यात अडचणी येऊ शकतात. याची जाणीव ठेवून विकासकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महारेराने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number