साईबाबा संस्थानच्या इतिहासात धक्कादायक प्रकार समोर

शिर्डी साईबाबा संस्थांच्या कंत्राटी कर्माचा-याने,थेट साईबाबांच्या झोळीत हात घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून कर्माचा-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. साईबाबा संस्थानच्या इतिहासात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात मागील काही दिवसांपूर्वी,साईभक्तांना बनावट देणगी पावती संदर्भात. निनावी पत्र प्राप्त झाल्याने, शिर्डी साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशी करून […]

साईबाबा संस्थानच्या इतिहासात धक्कादायक प्रकार समोर

शिर्डी साईबाबा संस्थांच्या कंत्राटी कर्माचा-याने,थेट साईबाबांच्या झोळीत हात घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून कर्माचा-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

साईबाबा संस्थानच्या इतिहासात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात मागील काही दिवसांपूर्वी,साईभक्तांना बनावट देणगी पावती संदर्भात. निनावी पत्र प्राप्त झाल्याने, शिर्डी साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशी करून गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली होती. सदर चौकशीत खळबळजनक माहिती समोर आली असून. संस्थांच्या लेखा शाखेतील कुशल कंत्राटी कर्मचा-याने,चक्क साईभक्तांच्या देणगी पावत्यांची अतिशय नियोजनबद्ध रित्या अफरातफर करत. थेट बाबांच्या झोळीतूनच,पैसे चोरल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून. या संताप जनक घटनेमुळे, शिर्डीसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात, साईबाबा संस्थानच्या लेखा शाखेतील कुशल कंत्राटी कर्मचारी,दसरथ भगवंत चासकर राहणार मलढोन,तालुका सिन्नर,जिल्हा नाशिक या कर्मचाऱ्या विरुद्ध भादवी कलम ४०८,४६५, ४२०,४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून. मागील ५ वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती देखील समोर आली आहे. तसेच या प्रकरणात आणखीन लोकांचा सहभाग असल्याची शक्यता देखील पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number