मुंबई, २७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : आमदार अपात्रतेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. अपात्रतेबाबतच्या सुनावणीच्या कामकाजाचे वेळापत्रक नार्वेकर यांच्या न्यायाधिकरणाने जाहीर केले आहे.६ ऑक्टोबर २०२३ : उद्धव गटातर्फे २३ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रावर शिंदे गटाचे वकील त्यांचे उत्तर/म्हणणे दाखल करतील.
१३ ऑक्टोबर २०२३ : अपात्रतेबाबतच्या सर्व याचिकांवर सुनावणी एकत्र व्हावी या उद्धव गटाच्या मागणीवर २३ सप्टेंबर २०२३ रोजी दोन्ही बाजूने युक्तिवाद
१३ ते २० ऑक्टोबर २०२३ : अपात्रतात सुनावणीबाबत विधानसभा सचिवालयात दाखल असलेल्या अधिकृत कागदपत्रांची, आदेशांची पाहणी करण्यासाठी, अधिकृत कागदपत्रे शोधण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वकिलांना संधी मिळणार
२० ऑक्टोबर २०२३ : अपात्रतेबाबतच्या सर्व याचिकांवर सुनावणी एकत्र व्हावी या उद्धव गटाच्या मागणीवर निर्णय / आदेश
२७ ऑक्टोबर २०२३ : दाखल झालेल्या कागदपत्रांपैकी कोणते डॉक्युमेंट्स अॅडमिट करायचे आणि कोणते नाकारायचे यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद
६ नोव्हेंबर २०२३ : अपात्रतेबाबत निर्णय घेताना काय मुद्दे विचारात घेतले पाहिजेत यावर दोन्ही लेखी स्वरुपात बाजू मांडणार. एकमेकांना त्याच्या प्रती देणार
१० नोव्हेंबर २०२३ : अपात्रतेबाबत निर्णय घेताना कोणते मुद्दे विचारात घेऊन निर्णय घ्यावा यावर यावर विधानसभा अध्यक्ष दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकतील.
२० नोव्हेंबर २०२३ : दोन्ही पक्षांनी त्यांच्या गटातील आमदारांची यादी आणि प्रतिज्ञापत्र दाखल करावी
२३ नोव्हेंबर २०२३ : उलट तपासणी सुरू आवश्यकतेनुसार तसेच दोन्ही पक्षांच्या वकिलांच्याव सोयीनुसार तारखा देण्यात येतील. शक्य असल्यास उलट तपासणी आठवड्यातून दोनदा.
अंतिम युक्तिवाद : प्रक्रिया संपल्यावर दोन आठवड्यानंतर अंतिम सुनावणीसाठी तारीख ठरणार
कुणाचीही अडचण नसल्यास तसेच कुणी सुनावणी तहकुबीचा अर्ज न दिल्यास शक्यतोवर ठरलेल्या तारखांनुसार सुनावणी पार पाडली जाईल आणि तारखांमध्ये काही बदल झाल्यास तसे वकिलांना कळवले जाईल असे विधानसभा सचिवालयाने विधानसभा अध्यक्षांच्या सहीने जाहीर केले.