कांदाप्रश्नी मुंबईत मंगळवारी बैठक

मुंबई, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत कांदा प्रश्नावर बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदार, बाजार समिती संचालक, व्यापारी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मागील सहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव बंद आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेला ४० टक्के कर रद्द करावा आणि नाफेड करत असलेली कांदा […]

कांदाप्रश्नी मुंबईत मंगळवारी बैठक

मुंबई, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत कांदा प्रश्नावर बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदार, बाजार समिती संचालक, व्यापारी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मागील सहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव बंद आहेत.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेला ४० टक्के कर रद्द करावा आणि नाफेड करत असलेली कांदा विक्री थांबवावी या दोन मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी संप सुरू केला आहे. संपावर तोडगा काढण्याचे आतापर्यंतचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे.

नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी

संप सुरू असल्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी थांबवली आहे. पण नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी आणि विक्री सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number