म्हाडाचे घर घेण्याची सुवर्णसंधी

मुंबई, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील गृहनिर्माण योजनेत बांधलेल्या पाच हजार ३११ घरांसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी, अर्जभरणा प्रक्रिया शुक्रवार १५ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. यासाठी ‘गो लाइव्ह’ कार्यक्रम सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे. यानंतर ७ नोव्हेंबर रोजी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात सकाळी अकरा […]

म्हाडाचे घर घेण्याची सुवर्णसंधी

मुंबई, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील गृहनिर्माण योजनेत बांधलेल्या पाच हजार ३११ घरांसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी, अर्जभरणा प्रक्रिया शुक्रवार १५ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. यासाठी ‘गो लाइव्ह’ कार्यक्रम सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे. यानंतर ७ नोव्हेंबर रोजी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात सकाळी अकरा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. यासाठी अर्जदारांनी housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा Mhada Housing Lottery System हे ॲप डाऊनलोड करून वापरावे, असे आवाहन म्हाडाच्या कोकण मंडळाने केले आहे.

अर्ज करण्याची मुदत १६ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ११.५९ पर्यंत आहे. अर्जदार १८ ऑक्टोबर २०२३ ला रात्री ११.५९ पर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करू शकतील. अनामत रक्कम भरणारे तसेच सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरतील. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी ३ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीवर अर्जदारांना ५ नोव्हेंबरला सायंकाळी पाच पर्यंत ऑनलाईन हरकत नोंदवता येईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम यादीत उरलेले अर्जदार ७ नोव्हेंबर रोजी सोडत प्रक्रियेत सहभागी होतील.

अर्जदारांना सोडतीचा निकाल तत्काळ मोबाइलवर एसएमएस, ई-मेल, ॲपवर प्राप्त होईल. तसेच त्याच दिवशी सायंकाळपासून यशस्वी अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number