आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा पुणे दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी देखील तयारी केली आहे. राज ठाकरे यांनी आज पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका तिन्ही निवडणुकांची तयारी करा. निवडणुकीचा तयारीला […]

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा पुणे दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी देखील तयारी केली आहे. राज ठाकरे यांनी आज पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसभा, विधानसभा आणि महापालिका तिन्ही निवडणुकांची तयारी करा. निवडणुकीचा तयारीला लागा. सर्व जागांसाठी तयारी करण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. मतदार याद्यांवर तातडीने काम सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहे. पुणे मनसेमध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात येत्या काळा लोकसभा पोटनिवडणूक लागण्याचीही शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून आढावा घेतला जाऊ शकतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number