मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील हत्येची घटना ताजी असतानाच आता मीरा रोड परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणाने आपल्याच प्रेयसीची हत्या करत तिच्या मृतदेहांचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन दिवसात मुंबईत दोन तरुणींची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी मनोज सहानीला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. सरस्वती वैद्य असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथील हॉस्टेलमध्ये तरुणीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता आफताब पुनावालाच्या धक्कादायक कृत्याची पुनरावृत्ती करणारी घटना मीरा रोड येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज (५६) आणि सरस्वती (३२) हे गेल्या काही वर्षांपासून नयानगर फेज-७ येथे राहत होते. त्यांच्या खोलीतून काही दिवसांपासून दुर्गंधी येत होती. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घराची पाहणी केली असता सरस्वतीची हत्या झाल्याचे समोर आले. यात तिच्या मृतदेहाचे काही तुकडेही करण्यात आले होते. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता घरात पायाचे तुकडे होते. अन्य अवयवाची आरोपीने विल्हेवाट लावल्याचे समजते. मनोज आणि सरस्वती यांच्यात सतत भांडणे व्हायची अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.यात तिच्या मृतदेहाचे काही तुकडेही करण्यात आले होते. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता घरात पायाचे तुकडे होते. अन्य अवयवाची आरोपीने विल्हेवाट लावल्याचे समजते. मनोज आणि सरस्वती यांच्यात सतत भांडणे व्हायची अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
आरोपींच्या घरात समोरच्या बाजूला सरवस्तीचा तुटलेला पाय होता. आरोपीने सरस्वतीच्या धडाची आणि अन्य अवयवांची विल्हेवाट लावली होती. परंतु एक हात आणि एक पाय घरात तसंच पडून होते. त्याचा वास आल्यानेच या घटनेचा भांडाफोड झाला आहे. आरोपी मनोज सहानीने करवतीच्या सहाय्याने सरस्वतीच्या मृतदेहांचे तुकडे केले असून सरस्वतीच्या बहुतेक अवयवांची विल्हेवाट लावली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले गेले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात आरोपीची चौकशी सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची असल्याची माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.