महाराष्ट्रात महापुरुषांची बदनामीचे सत्र सुरूच

मुंबई, ३१ मे २०२३, प्रतिनिधी :  राज्यात महापुरुषांची बदनामी करण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. मात्र, महापुरुषांची बदनामी करण्याचं सत्र हे थांबण्याचं नावच घेत नाहीये. आता एका इंग्रजी वेबसाईटने देखील समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या […]

महाराष्ट्रात महापुरुषांची बदनामीचे सत्र सुरूच

मुंबई, ३१ मे २०२३, प्रतिनिधी :  राज्यात महापुरुषांची बदनामी करण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. मात्र, महापुरुषांची बदनामी करण्याचं सत्र हे थांबण्याचं नावच घेत नाहीये. आता एका इंग्रजी वेबसाईटने देखील समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण केलं आहे. हे लिखाण आक्षेपार्ह असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईत आंदोलन केलं जात आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या अवमान प्रकरणी ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्यावतीने मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ यांनी इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर कठोर कारवाई करण्याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. हे अत्यंत वेदनादायी असून छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा प्रकार हा अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असं निवेदनात म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number