मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव २०२३ चे उदघाटन करण्यात आहे. पुण्यात व्यंगचित्र महोत्सव उद्दघाटन केल्यानंतर त्यांना व्यंगचित्र काढण्याचा आग्रह उपस्थितांनी केला. तेव्हा राज ठाकरे यांनी सध्याचा राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले.
राज ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे व्यंगचित्र काही मिनिटात काढले. राज्यात सुरु असलेल्या घडामोडी लक्षात घेता ठाकरेंनी अजित पवार यांचे व्यंगचित्र रेखाटले. यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणीसुद्धा केली.
“बऱ्याच दिवसांनी कुंचला हाती धरला आहे. बाळासाहेबांसारखी बैठक मारून चित्र काढायची सवय आहे. त्यामुळे आता वाग्यांचीत्र काढलंय ते गोआ मानून घ्या. व्यंगचित्र काढणं हे माझा पसंतीच काम आहे. व्यंगचित्र काढायला रोज माझे हात शिवशिवतात. परंतु राजकीय राजकीय कामकाजामुळे व्यंगचित्रासाठी वेळच मिळत नाही. बऱ्याचदा माझे व्यंगचित्र हे भाषणातून उमटतात. कला आपल्याला जे दाखवते ते विलक्षण असतं.”