उच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाहीच

‘मोदी आडनाव’ प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राहुल गांधी यांनी ‘मोदी आडनावा’ वरून सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती हेमंत प्रचारक सुट्टीनंतर निकाल देणार आहेत. तोपर्यंत राहुल गांधींना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. गुजरात हायकोर्टात मंगळवारी काँग्रेस नेते […]

उच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाहीच

‘मोदी आडनाव’ प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राहुल गांधी यांनी ‘मोदी आडनावा’ वरून सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती हेमंत प्रचारक सुट्टीनंतर निकाल देणार आहेत. तोपर्यंत राहुल गांधींना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

गुजरात हायकोर्टात मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर जूनमध्ये गुजरात उच्च न्यायालयने या प्रकरणावर निकाल देणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान मार्चमध्ये राहुल गांधी यांना २०१९ च्या मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते आणि सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेनंतर राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number