‘संजय राऊत कोण ? मी कोणत्याही संजय राऊतांना ओळखत नाही, कोणत्या तरी प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव घ्या. अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव गटाचे खासदार संजय राऊतांना फटकारले आहे. तसेच संजय राऊत, मातोश्री, शिवसेनेचा विषय संपला आहे. महाराष्ट्रात त्यांची सत्ता आता पुन्हा येणे नाही, असा टोला देखील मंत्री राणेंनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या विरोधात न्यायालयामध्ये अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. संजय राऊत यांच्या निवडणुकीसाठी पैसे खर्च केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. यावरून संजय राऊत यांनी न्यायालयात धाव घेत राणेंविरोधात ही याचिका दाखल केली आहे. याबाबत राणेंनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. आणि मी कोणत्या सभेला गेलो नाही. मी तसे काही बोललो नाही. संजय राऊत यांच्या प्रश्नाबद्दल मी उत्तर देणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले आहे.