मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली. देशपांडे यांच्या घटने संदर्भातील आरोपी पकडले आहे. लवकरच त्या संदर्भात सत्य समजेल अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मनसेच्या संदीप देशपांडेंवर अज्ञातांनी हल्ला केला होता, त्यात ते जखमी झाले आहेत. त्याची चौकशी सध्या पोलीस करत असून काहीजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणाबाबतही फडणवीस यांनी महत्वाची अपडेट दिली आहे. संदीप देशपांडेंनी काही शंका व्यक्त केल्या आहेत. पोलिस त्यासंदर्भात चौकशी करत आहे. लवकरच आपल्याला यातले सत्य समजेल, असे फडणवीसांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी मनसेच्या संदीप देशपांडेंवर अज्ञातांनी हल्ला केला होता, त्यात ते जखमी झाले आहेत. त्याची चौकशी सध्या पोलिस करत असून काहीजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.