पवारांनी मौन सोडले

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. पहाटेचा शपथविधी हा घडवून आणला होता, असा खुलासा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर आज पवार यावर बोलले आहे. शरद पवार यांनी म्हटले की, २०१९ साली नेमकं काय झालं? त्यावेळी […]

पवारांनी मौन सोडले

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. पहाटेचा शपथविधी हा घडवून आणला होता, असा खुलासा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर आज पवार यावर बोलले आहे.

शरद पवार यांनी म्हटले की, २०१९ साली नेमकं काय झालं? त्यावेळी सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा एकच फायदा झाला की, राष्ट्रपती राजवट होती, ती उठली. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं, हे तुम्ही पाहिलं असेल. शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केलं की पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती.

पुढे शरद पवारांनी म्हटले की, पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी बोलण्याची गरज नाही. काही गोष्टींबाबत तसंही बोलायची आवश्यकता नसते. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का, असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. मात्र, शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पहाटेच्या शपथविधीबाबत नव्याने चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. यावर भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number