उद्धव यांचं ऐकणार कोण ?

राज्याच्या सत्ता संघर्षावर मंगळवार पासून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पाच सदस्य घटनापिठापुढे सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मंगळवारपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत घटनापीठ सुनावणी घेईल. सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी घेत आहे. यात नबाम रेबिया प्रकरणानुसार पुढील सुनावणी व्हावी का […]

उद्धव यांचं ऐकणार कोण ?

राज्याच्या सत्ता संघर्षावर मंगळवार पासून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पाच सदस्य घटनापिठापुढे सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मंगळवारपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत घटनापीठ सुनावणी घेईल. सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी घेत आहे.

यात नबाम रेबिया प्रकरणानुसार पुढील सुनावणी व्हावी का याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं काल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीये. या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टासमोर केली. परंतु सरन्यायाधीशांनी याचिकेवर तात्काळ सुनावणीस नकार दिला आणि आज हे प्रकरण मेन्शन करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आज सत्तासंघर्षाची सुनावणी आधी होते की ठाकरेंच्या याचिकेवर कोर्ट आधी सुनावणी घेतं हे पाहावं लागणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान दिलं जाण्याची शक्यता गृहित धरून शिंदे गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलंय. आमचं म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाला केलीये. त्याच बरोबर उद्धव ठाकरे गटाकडून देखील ,मागणी करण्यात येत आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी उद्यापासून सुरू आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांनी निकाल देऊ नये अशी मागणी उद्धव गटाकडून करण्यात येत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number