पाच वर्षात २१ हजार सीड बॉल निसर्गाच्या कुशीत

इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी गेली सहा वर्षे प्रयत्न केले जात आहेत. तब्बल २१ हजार सीड बॉल निसर्गाच्या कुशीत टाकण्यात आले आहेत. यंदा पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येत्या आठवड्यात चार हजार सीड बॉल बनविण्यात येणार आहेत. माती, शेण आणि पाण्याचे मिश्रण केले. चिखलाचे गोळे करून त्यात विविध फळ बिया आणि सावली देणाऱ्या झाडाच्या […]

पाच वर्षात २१ हजार सीड बॉल निसर्गाच्या कुशीत

इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी गेली सहा वर्षे प्रयत्न केले जात आहेत. तब्बल २१ हजार सीड बॉल निसर्गाच्या कुशीत टाकण्यात आले आहेत. यंदा पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येत्या आठवड्यात चार हजार सीड बॉल बनविण्यात येणार आहेत. माती, शेण आणि पाण्याचे मिश्रण केले. चिखलाचे गोळे करून त्यात विविध फळ बिया आणि सावली देणाऱ्या झाडाच्या बिया घातल्या जातात हाताने गोल आकार सीड बॉल बनविले गेले.

बऱ्याचदा फळे खाऊन झाली की बिया फेकल्या जातात. त्या बिया शाळेच्या मुलांकडून व पालकांनाच्या माध्यमातून जमा केल्या जातात. या बिया संकलित करून सीड बॉल बनविले जात आहेत. बनवलेले सीड बॉल विविध डोंगरावर फेकण्यात येत आहेत. चिंचोके,जांभूळ,पपई ,फणस, बहावा, गुलमोहर, रानटी बाभूळ आदी आणल्या होत्या. लहान मुले, महिला पालकांसह माजी विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सहभाग नोंदवत सीड बॉल बनविण्यासाठी उत्साहाने सहभाग घेतला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number