यंदाचा आयपीएल मिनी लिलाव युएईमध्ये आयोजित करण्यात आला असल्यामुळे संघ व्यवस्थापनांसाठी योग्य खेळाडू निवडण्याची ही अखेरची आणि महत्त्वाची संधी असणार आहे. लिलावापूर्वीच अनेक संघांमध्ये देवाण-घेवाण झाली असून, काही धक्कादायक बदलही पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे यंदाच्या लिलावात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजल्यापासून लिलावपूर्व कार्यक्रमांना सुरुवात होईल. यामध्ये प्रत्येक संघाकडे उपलब्ध असलेली रक्कम, रिक्त खेळाडूंची संख्या आणि संघांच्या रणनीती याबाबत माहिती दिली जाणार आहे. यानंतर प्रत्यक्ष लिलावाला दुपारी 2.30 वाजता सुरुवात होणार आहे. म्हणजेच या वेळेपासून खेळाडूंवर बोली लावण्याचा थरार पाहायला मिळणार आहे.
दरम्यान आयपीएल या स्पर्धेत अनेक नव्या खेळाडूंना संधी दिल्याचं पाहायला मिळलं आहे. अशातच कोणाचं नशीब कधी चमकेल याचा काही ठावठिकाणी लावता येत नाही. अशातच एक 20 वर्षीय सोशल मीडियावर इन्फ्ल्युएन्सर आणि लेग-स्पिनर इजाज सवारिया आयपीएल 2026 च्या मिनी-लिलावात समाविष्ट होणार आहे. लिलावात तो 265 व्या क्रमांकावर आहे. इजाज सवारिया हा त्याचे क्रिकेटमधील कौशल्य दाखवण्यासाठी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गोलंदाजीचे व्हिडिओ अपलोड करायचा. त्याच्या एका व्हिडिओला इंग्लंडचा लेग-स्पिनर आदिल रशीदने कमेंट केली ज्यामुळे इजाज सवारिया मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. इजाज सवारिया मुळचा जरी राजस्थानचा असला तरी वडील वायुसेनेत असल्यामुळे तो कर्नाटकातील बिदर येथे लहानाचा मोठा झाला.
त्यानंतर त्याने 2017 मध्ये विजय क्रिकेट क्लबमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला मात्र तीन वर्षे तिथे खेळूनही त्याच्या वाटेला यश काही आलं नाही. त्यानंतर तो पुन्हा राजस्थानमध्ये परतला तिथे त्याला जिल्हा संघात स्थान मिळूनही खेळण्याची संधी मिळत नव्हती. त्यानंतर अखेर तो ESPNcricinfo सोबत संवाद साधत म्हणाली की, “चेन्नई सुपर किंग्जने माझ्याशी संपर्क साधला. आम्ही दोन-तीन वेळा बोललो. एका स्काउटने मला फोन केला. सुनील जोशी सरांनी माझी रील पाहिली आणि माझा नंबर मागितला. त्यानंतर पंजाब किंग्जने मला ट्रायल्ससाठी लखनौला बोलावले. मी त्यांना प्रभावित केले, त्यांना मी आवडलो आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांनी आयपीएल लिलावासाठी माझा फॉर्म भरला.” त्याने अद्याप एकही व्यावसायिक सामना खेळलेला नाही. मात्र तरी देखील त्याला आयपीएल 2026 च्या मिनी-लिलावात समाविष्ट करण्यात आले आहे. जर त्याला कोणत्या संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं तर तो आयपीएल दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात आपले कौशल्य कशा प्रकारे दाखवतो हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.