नाशिकमध्ये धक्कादायक घटनेत २ जणांचा मृत्यू

नाशिक ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिकमध्ये अंबड लिंक रोड येथे धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरून जात असलेल्या २ जणांवर १० ते १२ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या घटनेत मेराज खान आणि इब्राईम शेख या २ जणांचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. हल्ला प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. अंबड पोलीस हा […]

नाशिकमध्ये धक्कादायक घटनेत २ जणांचा मृत्यू

नाशिक ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिकमध्ये अंबड लिंक रोड येथे धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरून जात असलेल्या २ जणांवर १० ते १२ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या घटनेत मेराज खान आणि इब्राईम शेख या २ जणांचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. हल्ला प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. अंबड पोलीस हा तपास करत आहेत.

याआधी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात टोळक्याने नागरिकांवर हिंसक हल्ले करण्याचे प्रकार घडले होते. लुटालूट करणे, दहशत बसवणे यासाठी हल्ले होत होते. अनेकदा कोयता, सुरा, चॉपर अशी धारदार शस्त्रे वापरून हल्ले केले जात होते. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला होता. आता नाशिकमध्ये अंबड लिंक रोड येथे मुळशी पॅटर्नची पुनरावृत्ती झाली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

उपचारांमध्ये हलगर्जीपणा ?

हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाला. यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप काही नातलगांनी केला आहे. पण हॉस्पिटल प्रशासनाने नातलगांचा आरोप फेटाळला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number