भारतात ओमायक्रॉनचे १६० रुग्ण

ओमायक्रॉन विषाणूमुळे जगभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच भारतातही ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला आहे. देशात दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून भारतात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या १६०वर पोहचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत दिली आहे. भारतातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या १६०वर पोहचली असून देशातील ११ राज्यांमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. […]

भारतात ओमायक्रॉनचे १६० रुग्ण

ओमायक्रॉन विषाणूमुळे जगभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच भारतातही ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला आहे. देशात दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून भारतात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या १६०वर पोहचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत दिली आहे.

भारतातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या १६०वर पोहचली असून देशातील ११ राज्यांमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. या ११ राज्यांपैकी महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मराष्ट्रात ओमायक्रॉनचे ५४ रुग्ण आढळले आहेत. तसेच आता महाराष्ट्रानंतर नवी दिल्लीतही ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

महाराष्ट्रात रविवारी ओमायक्रॉन विषाणूच्या नव्या ६ रुग्णांची नोंद झाली. तर या ६ रुग्णांपैकी ४ रुग्ण मुंबईतील असल्याचे निदान समोर आले आहे. तसेच राज्यातील ५४ ओमायक्रॉनच्या रुग्णांपैकी सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच भारतात सोमवारी ६५६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number