Excercise Tips: जिममध्ये तासनतास घाम गाळण्याची गरज नाही; दीर्घायुष्यासाठी आठवड्यात ‘इतकाच’ वेळ व्यायाम पुरेसा, संशोधनातून मोठा खुलासा

अमेरिकन मेडिकल असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की नियमित हलकी शारीरिक हालचाल देखील आयुष्य वाढवण्यास मदत करू शकते.

Excercise Tips: जिममध्ये तासनतास घाम गाळण्याची गरज नाही; दीर्घायुष्यासाठी आठवड्यात ‘इतकाच’ वेळ व्यायाम पुरेसा, संशोधनातून मोठा खुलासा

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि असंतुलित आहारामुळे अनेकांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. फिट राहण्यासाठी अनेक जण जिममध्ये तासनतास घाम गाळतात, जड वजन उचलतात आणि कठीण व्यायाम करतात. मात्र अलीकडील एका संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी इतका कठोर व्यायाम करणे आवश्यक नाही. आठवड्यात केवळ 150 मिनिटे हलका व्यायाम केला तरी आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

अमेरिकन मेडिकल असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की नियमित हलकी शारीरिक हालचाल देखील आयुष्य वाढवण्यास मदत करू शकते. तज्ज्ञांच्या मते, आठवड्यात 150 मिनिटे म्हणजे दिवसाला साधारण 30 मिनिटे आणि तेही आठवड्यात फक्त पाच दिवस. एवढा वेळ शारीरिक हालचालीसाठी दिल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो.

संशोधनानुसार, जे लोक नियमितपणे इतका वेळ शारीरिक क्रियाकलाप करतात, त्यांच्यात दीर्घायुष्य मिळण्याची शक्यता अधिक दिसून येते. विशेषतः हृदयविकारांच्या बाबतीत याचा चांगला परिणाम दिसून येतो. जे लोक पूर्वी अजिबात व्यायाम करत नव्हते, त्यांनी थोडेफार चालणे किंवा हलका व्यायाम सुरू केल्यानंतर त्यांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा दिसून आल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: Ritu Tawde Controversy : मुंबईच्या नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नेमकं चाललंय काय? घड्याळ प्रकरणानंतर आता लाल दिव्याची गाडी; उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आमदाराचं ट्वीट चर्चेत

150 मिनिटांचा व्यायाम म्हणजे फक्त धावणेच असे नाही. तुम्हाला आवडणाऱ्या अनेक सोप्या क्रियाकलापांमधूनही हा वेळ पूर्ण करता येतो. उदाहरणार्थ, दररोज काही वेळ वेगाने चालणे, सायकल चालवणे, पोहोणे किंवा घरात संगीत लावून नाचणे हेही प्रभावी व्यायाम ठरू शकतात.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 150 मिनिटे हा केवळ सुरुवातीचा टप्पा आहे. जर एखाद्या व्यक्तीला अधिक वेळ व्यायामासाठी देता आला, तर त्याचे फायदेही अधिक मिळू शकतात. अभ्यासानुसार, जे लोक आठवड्यात 300 ते 600 मिनिटे व्यायाम करतात, त्यांच्यामध्ये मृत्यूचा धोका सुमारे 26 ते 31 टक्क्यांपर्यंत कमी आढळला आहे. तसेच धावणे किंवा जलद सायकलिंगसारख्या तीव्र व्यायामामुळे हृदय अधिक मजबूत राहते.

नियमित व्यायामाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. व्यायामामुळे हृदय अधिक कार्यक्षमतेने रक्त पंप करू शकते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर नियमित शारीरिक हालचालींमुळे रक्तदाब, मधुमेह आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजार नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे दररोज थोडा वेळ शरीराला हालचाल देणे हे निरोगी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

आरोग्यविषयक सूचना (Health Disclaimer): या बातमीत दिलेली माहिती ही सर्वसाधारण आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. कोणताही व्यायाम, उपचार किंवा आहार पद्धती अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ नये. या संदर्भात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.

हेही वाचा: Financial Rule Change: नवे आर्थिक वर्ष, नवे टॅक्स नियम; 1 एप्रिलपासून 'हे' बदल तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number