एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे आणि एसटी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ या मागण्यांसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारले. गेल्या दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे महामंडळाकडून संपकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे. औरंगाबादमधील १५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत तीनशेहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे महामंडळाकडून संपकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून औरंगाबादमधील १५ एसटी कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असली तरीही आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवास करण्यासाठी प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. मात्र खाजगी वाहनांकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरु आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.