पुणे, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील भोरमधील हरिश्चंद्री येथे महाविकास आघाडीचा भव्य शेतकरी मेळावा आहे. महाविकास आघाडीच्या भव्य शेतकरी मेळाव्यात कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. या सभेत राशपच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक वक्तव्ये केली.
सुप्रिया सुळे यांच्या भाषणातील मुद्दे
माझी लढाई दिल्लीतील अदृश्य शक्तींशी – खासदार सुळे
साडेनऊ वर्ष सतेत होतो तेव्हा भ्रष्टाचार दिसला नाही – खासदार सुळे
आदर्श घोटाळ्याच्या आरोपानंतर चव्हाण भाजपात – खासदार सुळे
माझ्या बारामतीतून उमेदवारीला हिरवा कंदील – खासदार सुळे
सोनिया, राहुल यांनी माझी उमेदवारी मान्य केली – खासदार सुळे
मराठा आरक्षणामुळे समाजाची फसवणुक – खासदार सुळे