प्रचार तोफा थंडावणार

पुणे, ११ मे २०२४, प्रतिनिधी : शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार तोफा शनिवारी थंडावणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची शनिवारी पुण्यात सांगता सभा होणार आहे.शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी नारायणगाव येथे शनिवारी, ११ मे रोजी सांगता सभा होणार आहे. या सभेसाठी शरद पवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, […]

प्रचार तोफा थंडावणार

पुणे, ११ मे २०२४, प्रतिनिधी : शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार तोफा शनिवारी थंडावणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची शनिवारी पुण्यात सांगता सभा होणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी नारायणगाव येथे शनिवारी, ११ मे रोजी सांगता सभा होणार आहे. या सभेसाठी शरद पवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, भास्करराव जाधव, चंद्रकांत हंडोरे, प्रवीण गायकवाड उपस्थितीत राहणार आहेत. या सांगता सभेत राशपचे शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी शनिवार शेवटचा दिवस आहे. शनिवारी, सायंकाळी ६ वाजता प्रचार बंद करावा लागणार आहे. सोमवारी, १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहेत. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number