संभाजीनगरात सभांचा धडाका

छत्रपती संभाजी नगर, १० मे २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,नितीन गडकरी ,उद्धव ठाकरे ,नवनीत राणा शुक्रवारी, १० मे रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. शुक्रवारी, १० मे रोजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वैजापूर येथे सभा घेणार आहेत. खासदार नवनीत राणा संभाजी नगर शहरात […]

संभाजीनगरात सभांचा धडाका

छत्रपती संभाजी नगर, १० मे २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,नितीन गडकरी ,उद्धव ठाकरे ,नवनीत राणा शुक्रवारी, १० मे रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे.

शुक्रवारी, १० मे रोजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वैजापूर येथे सभा घेणार आहेत. खासदार नवनीत राणा संभाजी नगर शहरात शक्ती प्रदर्शन करणार आहेत. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सिल्लोड जिल्ह्यात दुपारी सभा घेणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ शिउबाठाचे नेता उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे सभा पार पडणार आहे. एकाच वेळी, महायुती आणि मकहाविकास आघाडीची महत्वाची नेते मंडळी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत त्यामुळे ही नेते मंडळी कोणावर निशाणा साधतील, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी प्रचारसभांची धामधूम सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number