‘मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी कीर्तीकरांच्या प्रचारात’

मुंबई, ९ मे २०२४, प्रतिनिधी : मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी कीर्तीकरांच्या प्रचारात सहभागी झाला. हा गंभीर आरोप भाजपाचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर विरुद्ध शिउबाठाचे अमोल कीर्तीकर अशी लढत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांचे उमेदवार मतदारांमध्ये वावरत आहे. प्रचार अधिकाधिक वेगाने आणि प्रभावीरित्या करता यावा यासाठी दोन्ही […]

‘मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी कीर्तीकरांच्या प्रचारात’

मुंबई, ९ मे २०२४, प्रतिनिधी : मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी कीर्तीकरांच्या प्रचारात सहभागी झाला. हा गंभीर आरोप भाजपाचे आमदार अमित साटम यांनी केला आहे.

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर विरुद्ध शिउबाठाचे अमोल कीर्तीकर अशी लढत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांचे उमेदवार मतदारांमध्ये वावरत आहे. प्रचार अधिकाधिक वेगाने आणि प्रभावीरित्या करता यावा यासाठी दोन्ही उमेदवार समर्थकांची फौज घेऊन मतदारसंघात फिरत आहेत. कीर्तीकरांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत इक्बाल मुसा पण सहभागी झाला होता. इक्बाल मुसा हा मुंबईतल्या १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील एक आरोपी आहे. हा आरोपी कीर्तीकरांचा प्रचार करत होता, असे भाजपाचे आमदार अमित साटम म्हणाले. पण अमोल किर्तीकर यांनी हा आरोप फेटाळला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number