प्रचार रॅलीमध्ये जखमी मुलाला पाहून मुख्यमंत्री झाले भावूक

मुंबई, ५ मे २०२४, प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची रविवारी प्रचार रॅली ठाण्यातली किसन नगर येथून निघाली असता मुख्यमंत्री शिंदेंनी या रॅलीमध्ये स्वतः उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर एक मुलगा त्यांना जखमी झाल्याचे दिसून आले. या मुलाचा हात भाजला असून हा मुलगा व त्याची आई मुख्यमंत्र्यांसमोरून टाहू फोडत पुढे निघाले. […]

प्रचार रॅलीमध्ये जखमी मुलाला पाहून मुख्यमंत्री झाले भावूक

मुंबई, ५ मे २०२४, प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची रविवारी प्रचार रॅली ठाण्यातली किसन नगर येथून निघाली असता मुख्यमंत्री शिंदेंनी या रॅलीमध्ये स्वतः उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर एक मुलगा त्यांना जखमी झाल्याचे दिसून आले. या मुलाचा हात भाजला असून हा मुलगा व त्याची आई मुख्यमंत्र्यांसमोरून टाहू फोडत पुढे निघाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार रथ थांबवून क्षणाचाही विलंब न करता त्या मुलाकडे धाव घेतली. त्या मुलाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हाताला धरून एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले. या जखमी झालेल्या लहान मुलाचे नाव देखील रुद्रांश असल्याने मुख्यमंत्री शिंदे थोड्या प्रमाणात भाऊ झाल्याचे देखील दिसून आले. आमच्या घरी देखील एक रुद्रांश आहे असे भावनिक आवाजात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या प्रसंगामुळे मुख्यमंत्र्यांच्या मनातील लहान मुलांविषयी असलेली संवेदनशीलता दिसून आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number